औरंगाबाद: सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा ‘जिद्दारी’ हा मराठी चित्रपट १८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात दाखल होणार असल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल शिंदे यांनी दिली.
विदुला बावीसकर, विजय अंजन आणि शुभम तारे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एक प्रेमकथा आहेच पण त्यात महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांनाही वाचा फोडण्यात आली आहे. कथा ग्रामीण संस्कृतीत रुजलेली असल्याने संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण मराठवाड्यातील अंबेजोगाई आणि बीडमध्ये करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दिप्ती जाधव शेंदरकर निर्मित जिद्दारी या चित्रपटाचे संगीत देव सुचीर यांचे आहे तर गीते सुहास मुंडे आणि निखिल राजवर्धन यांनी लिहिली आहेत.