– ( नितीन येलमार )
जागतिक स्थरावर भारतीय अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या स्थानावर पोहचणार, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अर्थतज्ज्ञ देत आहेत. 2047 पर्यंत देश ‘ आर्थिक महासत्ता ‘ हे बिरुद अभिमानाने मिरवतांना दिसेल असे स्वप्नंही दाखविले जात आहे. पण, आजच 145 कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशापुढे त्यावेळी कोणत्या समस्यांचे ताट वाढून ठेवलेले असेल याचे चित्र कोणी रेखाटताना दिसत नाही. देशाची त्यावेळची लोकसंख्या, उपलब्ध रोजगार, स्वयं रोजगार,कुशल मनुष्यबळ, बेरोजगारांची संख्या, वृद्ध नागरिक आणि रोजगारक्षम नागरिक यांचे समतोल प्रमाण या गोष्टींचा उहापोह होणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने या लेखामालेद्वारे घेतलेला आढावा, खास ‘ विश्व सह्याद्री न्यूज ‘ च्या वाचकांसाठी देत आहोत…
2024 मध्ये ग्लोबल मेंटल हेल्थ रिपोर्ट घेण्यात आला, ज्यामध्ये 72 लाख लोकांचा सर्वे घेण्यात आला, 5 लाख लोकांचे इंटरव्हि्व घेण्यात आले. त्यामध्ये 72 देशामध्ये भारताचा 61वा नंबर लागतो.
याच्या मुख्य कारणापैकी एक कारण म्हणजे ‘इलीनेशन’ म्हणजे आपण जे काही काही काम करतो त्याच्याशी स्वतःचा संबंध जोडू शकत नाही. मशीन यंत्रासारखे काम करतोय, असे वाटणे.
एकदंरीत माणसांचा ‘आडेंटिटी क्रायसिस’ झाला आहे. त्यामुळे फासजिंम, ऑटोक्रिटिक रुल निर्माण होणे म्हणजे आपण कुणावरती तरी अवलंबून आहे हे वाढणे. उदा. हा नेता, हा उद्योगपती, अमुकतमुक माझ्यासोबत आहे, आपल्यासोबत आहे यासाठी धडपड करणे. त्यामुळे लोनलीनेस वाढला आहे.
इंडिया हा आज ‘one of the most depressed’ देश समजला जातो. एका सर्वेनुसार भारताचे ‘मेंटल इलनेस’ चे प्रमाण 2017 मध्ये 17% होते ते 2025 मध्ये 25% होईल, असा अंदाज आहे.
हॅपीनेस इंडेक्स मध्ये आपला 146 पैकी 126 वा लागतो. म्हणजे खूपच कमी आहे.
सर्वांमागे एंग्ज़ाइटी, डिप्रेशन, इनइक्वलिटी, अनइंप्लॉयमेंट ही प्रामुख्याने कारणे आहेत. भारतातील 145 लोकसंख्येपैकी साधारणत: 90 कोटी लोक काम करू शकतात. बाकीच्या मध्ये 55 कोटी वृद्ध, बालके व इतर आहेत. या 90 कोटी पैकी 40 ते 45% लोकच खरे काम करत आहेत. म्हणजे जवळपास 55 कोटी बेरोजगार आहेत, त्यांचा मोठा प्रश्न आहे.
त्यामध्ये आपण आपल्याला जे काही वाटत आहे ते जगतच नाही आहोत, इतरांना आपण काय करावंसं वाटतं त्याप्रमाणे आपण जगतो आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झाले नाही की मग स्वतःमध्ये एक न्यूनगंड तयार होतो.
म्हणजेच “इन्फेरियर कॉम्प्लेक्स” मध्ये जाणे- सातत्याने इतरांशी तुलना करणे, इतरांच्या नजरेतून पाहणे.
हे थांबवले पाहिजे आणि स्वतःला काय वाटते याचा rationaly विचार करून अनेक गोष्टींना तोंड देऊ शकतो, अनेक समस्या सोडवू शकतो. तसे न होणे म्हणजे समजाकडून आपल्यावर सर्व हे लादले जाणे होय.