Home Pimpri-Chinchwad चिखली घरकुलची वाटचाल ‘सोलर सिटी’कडे : आमदार महेश लांडगे

चिखली घरकुलची वाटचाल ‘सोलर सिटी’कडे : आमदार महेश लांडगे

0
चिखली घरकुलची वाटचाल ‘सोलर सिटी’कडे : आमदार महेश लांडगे<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

– सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांचा पुढाकार
– सौर ऊर्जामुळे इमारतींच्या वीजबिलात होणार बचत

पिंपरी । प्रतिनिधी
चिखली येथील घरकूल प्रकल्पातील २० इमारती आता सौर ऊर्जामुळे वीजेच्या बाबत स्वयंपूर्ण होणार आहेत. त्यामुळे वार्षिक वीज बिलात बचत होणार असून, सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या पुढाकारने घरकूलची वाटचाल आता ‘सोलार सिटी’कडे होत आहे, असे मत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

फेडरेशन ऑफ घरकूल आणि शिवतीर्थ प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त सामाजिक वारसा आणि वसा जोपासलेले सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या प्रयत्नातून घरकूलमधील २० इमारतींना सौर ऊर्जा प्रकल्प लोकार्पण आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी माजी महापौर व नगरसेवक नितीन काळजे, माजी महापौर व नगरसेवक राहुल जाधव, फ-प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, कामगार नेते विष्णुपंत नेवाळे, सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, सरिता नेवाळे, अजय जाधव, संतोष ठाकूर, अजय पाताडे, संदीप नेवाळे, अरुण पाडुळे, संभाजी बालघरे, गणेश यादव,फेडरेशन ऑफ घरकुलचे अध्यक्ष सुधाकर धुरी आदी उपस्थित होते.

माजी महापौर राहुल जाधव म्हणाले की, घरकूलमधील सांडपाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमदार महेश लांडगे आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या पुढाकाराने हे मार्गी लावण्यात येणार आहे.

कामगार नेते विष्णूपंत नेवाळे म्हणाले की, समाविष्ट गांवातील विकासाला चालना देण्याचे काम आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे म्हणाले की, घरकूलमध्ये बसवण्यात आलेल्या सोलार पॅनलची गॅरंटी सुमारे २५ वर्षे इतकी आहे. या सोलार पॅनलमुळे वार्षिक वीजबिलामध्ये २ लाख रुपयांपर्यंतची बचत होणार आहे. यापुढील काळात घरकूलमधील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश चौधरी यांनी, तर आभारप्रदर्शन फेडरेशन अध्यक्ष सुधाकर धुरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवतीर्थ प्रतिष्ठानच्या सभासदांनी योगदान दिले.
*
आमदार लांडगे यांची आश्वासनपूर्ती…
आमदार महेश लांडगे यांनी वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळ्यासाठी नोव्हेंबर महिन्यात चिखली, घरकूल येथे भेट दिली होती. त्यावेळी आगामी काळात घरकूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वयीत करण्यात येईल. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहोत, असे आश्वासन आमदार लांडगे यांनी दिले होते. त्यानंतर अवघ्या अडीच महिन्यांत आमदार लांडगे यांनी आश्वासनपूर्ती केली आहे. यामुळे घरकूलमधील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
*
फेडरेशन ऑफ घरकूलच्या कार्याचे कौतूक…
फेरडेशन ऑफ घरकूलने सामाजिक कार्यात कायम आघाडी घेतली आहे. कोविड काळात गरजू नागरिकांना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप, आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड, औषध फवारणी आदी कामांसाठी फेडरेशनच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेतला. आगामी काळात संपूर्ण घरकूलमध्ये सर्व सोसायट्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक आणि सोलार पॅनल बसवण्याबाबत फेडरेशन आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांनी पाठपुरावा केला. घरकूलच्या इमारतींमध्ये सोलर पॅनल बसवल्यास सार्वजनिक वीज बिल कमी होईल. सोसायट्यांवर येणारा आर्थिक खर्चाचा बोझा करून अर्थिकदृष्ट्या घरकुलवासीयांना सक्षम करता येईल. फेडरेशन ऑफ घरकूल येथे सर्वांसाठी वडिलधार्‍यांची भूमिका घेते. आणि त्याप्रमाणे माझ्याकडे समस्या घेऊन येत असते. वडीलधारी मंडळी ज्याप्रमाणे कुटुंबाची काळजी घेतात. त्याप्रमाणे हे फेडरेशन ऑफ घरकुल येथे सर्वांच्या अडिअचणीसाठी पाठपुरावा करत असते, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here