हात से हात जोडो अभियान आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे – सोनल पटेल
पिंपरी, पुणे (दि. 22 जानेवारी 2023) खासदार राहुल गांधी यांचे भारत जोडो अभियान अंतिम टप्प्यात असताना आता 26 जानेवारी पासून 26 मार्च पर्यंत देशभर “हात से हात जोडो” हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात देशभर नागरिकांमध्ये महागाई, बेरोजगारी विषयी तीव्र नाराजी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हात से हात जोडो अभियानात सामील करून घ्यावे व हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा महाराष्ट्र काँग्रेसच्या सह प्रभारी सोनल पटेल यांनी केले.
शनिवारी (दि.21) नवी सांगवी येथे शहर काँग्रेसची आढावा बैठक झाली. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी संजय राठोड, काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम, काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष शामला सोनवणे, माजी आमदार दिप्ती चवधरी, महाराष्ट्र प्रदेश सचिव श्याम उमालकर, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, महिला शहराध्यक्ष सायली नढे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, दिलीप पांढरकर, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी सदस्य स्वाती शिंदे, डॉ. मनीषा गरुड, सेवादल शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, युवक शहर अध्यक्ष कौस्तुभ नवले, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष वसीम इनामदार, एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, ग्राहक संरक्षण दलाचे झेवियर अँथोनी, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष विजय ओव्हाळ, ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, विजय जगताप, विठ्ठल शिंदे तसेच राहुल ओव्हाळ, राजेंद्र काळभोर, जॉर्ज मेथ्यु
आदींसह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सोनल पटेल यांनी सांगितले की, हे अभियान ब्लॉक आणि बूथ लेवल पर्यंत राबवून नागरिकांच्या घरोघरी जाऊन खासदार राहुल गांधी यांनी दिलेले पत्र द्यायचे आहे. यापूर्वी डिजिटल नोंदणी करून सभासद झालेल्या सदस्यांना देखील सामावून घेतले जावे. युवक काँग्रेसने प्रत्येक प्रभागात दुचाकी रॅली काढून जनजागृती करावी. तसेच महिला कार्यकर्त्यांनी देखील विविध क्षेत्रातील महिलांशी संपर्क साधून काँग्रेसचे ध्येय धोरणे घरोघरी पोहोचवावीत. हे अभियान महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना उपयोगी ठरेल. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने व्हिजन डॉक्युमेंट तयार करून सर्वांनी एकोप्याने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करावे आणि काँग्रेसचे संघटन मजबूत करावे असे सोनल पटेल यांनी सांगितले. 27 फेब्रुवारी रोजी चिंचवड विधानसभा निवडणुकीचे मतदान आहे. या जागेवर काँग्रेसने उमेदवार उभा करावा अशी आपली सर्वांची भावना आहे या बैठकीतील मत मी पक्षश्रेष्ठींपुढे मांडेल पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो सर्वांनी पाळावा असे सोनल पटेल यांनी सांगितले.
महाराष्ट्रात मित्र पक्षांबरोबर राहिल्यामुळे काही ठिकाणी काँग्रेसचे नुकसान झाले आहे. तिथे आता लक्ष देऊन काँग्रेसचे संघटन वाढवण्यासाठी काम केले जाईल. वेळप्रसंगी श्रेष्ठींनी आदेश दिले तर स्वतंत्र लढण्याची देखील तयारी करावी लागेल असे सोनल पटेल यांनी सांगितले.
डॉ. कैलास कदम यांनी सांगितले की, चिंचवड विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा उमेदवार उभा करावा असा ठराव आजच्या बैठकीत संमत करण्यात आला. ही निवडणूक लढण्यासाठी दोन महिला आणि चार पुरुष पदाधिकारी तीव्र इच्छुक आहेत. चिंचवड विधानसभेत एकूण 19 प्रभाग आहेत. त्या खालोखाल भोसरी 16 आणि पिंपरीत 11 प्रभाग आहेत. त्यामुळे चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्राला शहराच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. या ठिकाणी यापूर्वी काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढवली आहे. सोमवारी पुण्यामध्ये समताभूमी येथे हात से हात जोडो या अभियानाचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार आहे यावेळी पिंपरी चिंचवड मधून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहून चिंचवड विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी आग्रह धरणार आहेत.
यावेळी संजय राठोड, दिप्ती चवधरी, शाह आलम, शाम उमालकर, निगार बारस्कर यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी शुभांगी घाडगे, वैष्णवी घाडगे, आरती मासुळकर, रेश्मा बनसोडे, सारिका पुरोहित, बापू लोहकरे, संतोष बनसोडे, संतोष चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
स्वागत डॉ. कैलास कदम, सूत्र संचालन किरण खाजेकर आणि आभार मिलिंद फडतरे यांनी मानले.