
पुणे: प्रतिनिधी
गणेशोत्सव 2023 दरम्यान संकल्प को. ऑप. क्रेडिट सोसाआयटी तर्फे पुणे शहरातील पोलीस बंधू भगिनीसाठी दिनांक २३ सप्टेंबर ते गणेश विसर्जन पर्यंत BodyFy च्या सहकार्याने अँक्युप्रेशर थेरपी कॅम्प आयोजित केला असून अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी याचा लाभ घेतांना दिसत आहे. गणेश उत्सव दरम्यान पुणे शहरात लाखोंच्या संख्येने गणेशभक्त बाप्पांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांना व्यवस्थित पद्धतीने दर्शन व्हावे यासाठी पोलीसबांधव दिवस रात्र उभे राहून ड्युटी करत असतात. या दरम्यान अनेक धावपळ देखील यांची होत असते. अश्यावेळी पायाला सूज येणे, हात पाय व कंबर दुखी यासारखा त्रास सहन करावा लागतो.
हाच त्रास कमी करण्यासाठी युवा उद्योजक स्वप्लिन सुधीर घायाळ यांनी संकल्प को. ऑप. क्रेडिट सोसाआयटीच्या वतीने पुणे शहरात मध्यवर्ती असलेले फरासखाना, विश्रामबागवाडा, स्वारगेट, खडक, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये या थेरीपीची सेवा दिली जात असून आतापर्यंत पाचशेहून अधिक पोलिसांनी याचा लाभ घेतला असल्याची माहिती स्वप्नील घायाळ यांनी दिली.
या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी महापौर अंकुश काकडे, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भेट दिली तर पोलीस उपायुक्त, संदीपसिंह गिल, वरीष्ठ पोलीस निरिक्षक विनायक गायकवाड, वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल माने, सुनील झावरे व गुन्हे विभागांचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, अभय महाजन यांच्या सह पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले.