
पिंपरी, ता. ७ ः नागरिकांशी सुसंवाद साधणे, त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे, प्रशासकीय निर्णय आणि विकासकामांमध्ये त्यांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे, यासाठी महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रिय कार्यालयांत महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभा आयोजित करते. मे महिन्यांतील पहिली जनसंवाद सभा सोमवारी (ता. ८) सकाळी १० ते १२ या वेळेत होईल. त्यासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी मुख्य समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा होतील, असे जनता संपर्क विभागाने कळविले आहे.
—