Home Maharashtra Special कोळीवाड्यांचा विकास नवीन नियमावलीनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

कोळीवाड्यांचा विकास नवीन नियमावलीनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

कोळीवाड्यांचा विकास नवीन नियमावलीनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

मुंबई, दि 25 : मुंबई शहरातील कोळीवाड्यांचा विकास नवीन विकास नियमावलीनुसार केला जाईल असे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

लक्षवेधी सूचनेवरील चर्चेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कीमुंबईतील कोळीवाड्यांचे रेखांकन करण्यात आले आहे. रेखांकनाच्या बाहेर असलेल्या झोपडपट्टींचा विकास केला जाईल. मात्र रेखांकनात समावेश असलेल्या कोळीवाडा क्षेत्रांचा विकास करण्यासाठी नवीन विकास नियमावली तयार करण्यात येत आहे. त्या नियमावलीनुसार कोळी वाड्यांचा विकास केला जाईल.

मुंबईतील विविध झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्रकल्पांबाबत सर्व आमदारांची व्यापक बैठक बोलावली जाईल. तसेच झोपडपट्टी पात्रतेबाबत एक विशेष कार्यप्रणाली विकसित केली जाईलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

झोपडपट्टी पुनर्वसन विकास करताना भाडे न देणाऱ्या विकासकांविरुध्द कारवाई करण्यात येईल. भाडे देण्यासाठी सक्ती करण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

कॅप्टन आर. तमिल सेल्वनअस्लम शेखयोगेश सागरअतुल भातखळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here