पुणे: प्रतिनिधी
“कुठलेही काम करीत असतांना ते सगळ्यात चांगले व आपले समजून करावे. तसेच आपली उत्पादने निर्माण करावयाची असल्यास त्याचा अभ्यास व संशोधन केले पाहिजे, असे प्रतिपादन बिव्हीजी कंपनीचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड यांनी केले.
ते पुणे मॅनेजमेंट असोसिएशन व एसएमजे कंन्सलटंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित SIT- सिट(Short Inspring Tale) या कार्यक्रमात बोलत होते.
आयएमडीआर डीईएस संकुल येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष संजय गांधी, सचिव प्रदीप तुपे, एसएमजे कंन्सलटंटचे राहुल जोशी आदी मान्यवरांच्या बरोबरच मनुष्यबळ क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अभिजित खुरपे यांनी आभार प्रदर्शन केले.