Home Uncategorized कोट्यावधी भारतीयांचे जीवनमान उंचावण्याचा भाजपचा संकल्प

कोट्यावधी भारतीयांचे जीवनमान उंचावण्याचा भाजपचा संकल्प

कोट्यावधी भारतीयांचे जीवनमान उंचावण्याचा भाजपचा संकल्प<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

निवडणूक जाहीरनाम्याद्वारे घोषणांची बरसात 

नवी दिल्ली: प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात विविध समाज घटकांसाठी घोषणांची बरसात करण्यात आली आहे.

दारिद्र्यरेषेखालील घटकांना मोफत रेशन, 70 वर्षावरील नागरिकांना आयुष्यमान योजनेचा लाभ,, गरिबांसाठी तीन कोटी घरांची उभारणी, घरोघरी पाईपद्वारे गॅस अशा अनेक घोषनांचा जाहीरनाम्यात समावेश आहे.

मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.  गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारे असेल.
७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल. सर्व प्रकारच्या आर्थिक वर्गातील ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार.

गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधणार. मुद्रा योजनेची व्याप्ती २० लाखांपर्यं वाढवणार तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार. गुंतवणुकीद्वारे जीवनमान, जीवनाचा दर्जा आणि नोकऱ्यांवर लक्ष देण्याचा प्रयत्न करणार.

घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचविणार. पीएम किसान योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार.
सहकारातून समृद्धीच्या दृष्टीकोनातू राष्ट्रीय सहकार धोरण आणणार.
देशभरातील दुग्धव्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्याही वाढवण्यात येणार.

पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल.
जेनेरिक औषधांची केंद्र आणखी वाढवण्यात येणार. उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षांपर्यंत वाढविण्यात येणार.
महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार.

कोट्यवधी लोकांची वीजबील शून्य करण्यावर भर देण्यात येणार.
कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार.
महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार. ३ कोटी महिलांना लखपती करणार, महिलांना आयटी, टुरिझमकडे वळवणार.
मुद्रा योजना १० लाखांवरून २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल, अशा घोषणा भाजपच्या  जाहीरनाम्यात करण्यात आले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here