Home Pune ‘कैद्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी विशेष उपक्रम राबवणार’

‘कैद्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी विशेष उपक्रम राबवणार’

‘कैद्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी विशेष उपक्रम राबवणार’

महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांची घोषणा

पुणे: प्रतिनिधी

कारागृह हे आमचे कुटुंब आहे. या कुटुंबाच्या सदस्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक- कारागृह व सुधारसेवा मा. अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून कैद्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी विविध प्रकल्प कार्यरत आहेत आणि या वाटचालीमध्ये भोई प्रतिष्ठान सारख्या स्वयंसेवी संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा डॉ.जालिंदर सुपेकर यांनी केले.

भोई प्रतिष्ठानच्या वतीने कारागृहातील कैद्यांसाठी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात कैद्यांना चष्मे वाटप डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. गरजू रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया भोई प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, सहकार्य ही मोलाची गोष्ट आहे.

कारागृह प्रशासनाने बंदी बांधवांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी केलेल्या प्रयत्नाला बंदी बांधवांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देउन येथून बाहेर पडल्यावर ताठ मानेने जागण्याचा संकल्प करावा. वाचन करून समाजात वेगळी ओळख निर्माण करावी.

कारागृह अधीक्षक एस एन ढमाळ, महिला कारागृह अधीक्षक पल्लवी कदम, तुरुंग अधिकारी राजेंद्र मरळे, संतोष कोकणे, मिलिंद उजागरे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजक कारागृह अधीक्षक एस एन ढमाळ यांनी कार्यक्रमाचे आयोजनामाची भूमिका स्पष्ट करताना बंदीजनांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी भोई प्रतिष्ठान गेली सात वर्षे करीत असलेल्या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून यापुढेही असे कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबवण्यात येतील असे सांगितले.

भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांच्या नेतृत्वाखाली नेत्ररोग तज्ञ डॉ. नितीन कोलते, डॉ. विजय कुंभार, डॉ.मंगेश भट, शेठ ताराचंद रुग्णालय, पुणे, यश हॉस्पिटल यांनी या कार्यक्रमाचे आयोजनात सहभाग घेतला