पुणे : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्हीच पुण्यात पाचारण करता. त्यांना पुरस्कार देता. आदर सत्कार करता. मग त्यांच्याच विरोधात आम्ही मतदारांकडे मते कोणत्या तोंडाने मागायची, अशा शब्दात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडूनच खुद्द केसरी वाड्यात टिळक कुटुंबीयांबद्दलचा राग व्यक्त झाला.
लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक केसरी वाडा येथे आयोजित करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाचा दीर्घकाळ बालेकिल्ला राहिलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून रवींद्र धंगेकर यांनी जणू चमत्कारच घडविला. त्यामुळेच त्यांना लोकसभेचे उमेदवार ही घोषित करण्यात आले. लोकसभा निवडणुकीतही कसबा विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य दंगेकर यांना मिळवून देण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
मात्र, काँग्रेसचे नेते रोहित टिळक या बैठकीत आले आणि बैठकीचा नूरच पालटला. सन्मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार टिळक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्याबद्दल चा राग या बैठकीत व्यक्त करून उपस्थित असलेले काँग्रेसचे नेते बैठकीतून निघून गेले.
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरसेवक वसंत मोरे हे देखील रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत नाराजीचा फटका दंगेकर यांना बसू नये यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय निरीक्षकांचे पथकही पुण्यात दाखल झाले आहे. आयात विरुद्ध निष्ठावंत, अनुभवी विरुद्ध नवखे अशा वादांचा फटका काँग्रेसला बसू नये यासाठी हे पथक प्रयत्न करीत आहे. तरीही काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद कोणत्या ना कोणत्या मार्गाने