Home Pimpri-Chinchwad कुणाची नाराजी असेल तर भेट घेऊन सर्वसामावेशक काम करू – शंकर जगताप

कुणाची नाराजी असेल तर भेट घेऊन सर्वसामावेशक काम करू – शंकर जगताप

0
कुणाची नाराजी असेल तर भेट घेऊन सर्वसामावेशक काम करू – शंकर जगताप

पिंपरी- चिंचवड शहर भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या शहराध्यक्ष पदाच्या निवडीला विरोध दर्शवला आहे. त्यांच्या या निवडीमुळे भाजपमध्ये दुफळी निर्माण होऊ शकते असं म्हणत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. अमोल थोरात यांना भाजपाचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं असून, घर म्हटलं की नाराजी येते, जर कोणी नाराज असेल तर लहान भाऊ, मित्र म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्याशी चर्चा करून सर्वसमावेश काम करू असं म्हटलं आहे.

शहराध्यक्ष पदाच्या निवडीला पक्षांतर्गत विरोध असल्याचा प्रश्न शहराध्यक्ष शंकर जगताप यांना विचारला असता ते म्हणाले, अजूनपर्यंत तर तसं माझ्या कानावर काय आलेलं नाही. घर म्हटलं की थोडी नाराजी असते. जरी कुणाची नाराजी असेल तर मी लहान भाऊ म्हणून मित्र म्हणून सर्वजण त्यांच्याशी चर्चा करू आणि सगळ्यांना घेऊन सर्वसामावेशक काम करू.