Home Maharashtra Special कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केल्याबद्दल पवार साहेबांचे आभार – अजित गव्हाणे

कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केल्याबद्दल पवार साहेबांचे आभार – अजित गव्हाणे

0
कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केल्याबद्दल पवार साहेबांचे आभार – अजित गव्हाणे<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फटके फोडून, पेटे वाटून आनंदोत्सव साजरा

पिंपरी – भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत देशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. अशा वातावरणात शरद पवार यांच्या सारख्या अनुभवी आणि मुत्सद्दी नेत्यांची देशाला गरज आहे. त्यामुळे  पवार साहेबांनी पक्षाचे अध्यक्ष पद सोडू नये, अशी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी तीव्र भावना होती. पवार साहेबांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा माघार घेतल्याबद्दल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात शुक्रवारी (दि.5) सायंकाळी फटाके फोडून, पेटे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी गव्हाणे बोलत होते.
गव्हाणे पुढे बोलताना म्हणाले की, पवार साहेबांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात दुःख झाले होते. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, म्हणून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. तर मुंबईत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलन सुरू होते. तसेच नवीन अध्यक्ष निवडीसाठी समिती नेमली होती. मात्र, समितीच्या सर्व सदस्यांनी पवार साहेबांनीच पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहावे, अशी मागणी करत राजीनामा फेटाळला. अखेर पवार साहेबांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून राजीनामा मागे घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो.

आनंदोत्सवाला शहराध्यक्ष  अजित गव्हाणे , माजी महापौर संजोग वाघेरे पाटील , माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शाम लांडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर,  प्रवक्ते विनायक रणसुभे, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, वसंत बोराटे, शशिकिरण गवळी, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, अर्बन सेल अध्यक्ष दत्तात्रय जगताप, अर्बन सेल महिला अध्यक्ष मनीषा गटकळ , वाहतूक सेल अध्यक्ष काशिनाथ जगताप, देवेंद्र तायडे, खजिनदार दीपक साकोरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, उपाध्यक्ष विशाल आहेर, उद्योग व्यापार सेल अध्यक्ष विजय पिरंगुटे, व्ही जे एन टी सेल महिला अध्यक्ष निर्मला माने, ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष सचिन औटे, कामगार सेल कार्याध्यक्ष युवराज पवार, उपाध्यक्ष अरुण पवार, दत्ता बनसोडे, सुनील कुसाळकर, विजय दळवी, अनंत सुपेकर, विशाल आहेर, भूपेंद्र तामचीकर, लता ओवाळ, महीला मुख्य संघटिका मीरा कदम, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष आयुष निंबाळकर, सरचिटणीस राजन नायर, सुदाम शिंदे, अनिल भोसले, अनिल भोसले, बाळासाहेब जगताप, वाहतूक सेल संपर्कप्रमुख राजू खंडागळे, युवक उपाध्यक्ष ओम क्षिरसागर, अण्णा पाखरे, निखिल घाडगे, महिला समन्वयक सुप्रिया सोळाकुरे, ॲड.विशाल जाधव, सुरज पटेल, ओम शिरसागर, युवक सरचिटणीस ऋषी गोळे, विकास कांबळे, रुबान शेख, रजनीकांत गायकवाड, युवक सचिव अमोल बेंद्रे, इम्रान शेख, प्रभाग अध्यक्ष अशोक पोटे, कार्यालयीन व्यवस्थापक धनाजी तांबे, कार्यालयीन सेवक सुनील आडागळे, गणेश हरजुळे इत्यादीपदाधिकाऱ्यांसह पक्षाचे माजी नगरसेवक व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here