Home Politics काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे शिवसेना शिंदे गटात

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे शिवसेना शिंदे गटात

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे शिवसेना शिंदे गटात

मुंबई: प्रतिनिधी

काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. काही नेत्यांच्या राजकारणामुळे काँग्रेस पक्ष रसातळाला गेला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

यापूर्वी काँग्रेसने ते मिलिंद देवरा, अशोक चव्हाण, बाबा सिद्दिकी या भाड्याने त्यांनी काँग्रेसचा त्याग करून इतर पक्षात प्रवेश केला आहे.. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची बाजू माध्यमांसमोर हिरिरीने मांडणारे प्रवक्ते राजू वाघमारे यांनीही पक्ष सोडून शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

काही नेत्यांच्या राजकारणामुळे काँग्रेस पक्षाची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेसचे नेते शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली आहेत. या दबावामुळेच सांगलीची जागा शिवसेनेने तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपल्या पदरात पाडून घेतली, अशी टीका वाघमारे यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. आपण काँग्रेसमध्ये असताना आलेल्या एका सर्वेक्षण अहवालात एकनाथ शिंदे हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे नमूद केले होते. ते वातानुकूलित कक्षात बसून हुकूम सोडणारे मुख्यमंत्री नाहीत तर सर्वसामान्य जनतेत सहभागी होऊन त्यांच्यासाठी काम करणारे नेते आहेत, असेही वाघमारे यांनी नमूद केले.

 ना झेंडा ना अजेंडा 

काँग्रेस पक्षाला ना झेंडा उरला आहे ना अजेंडा, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली. महाविकास आघाडीच्या काळात अनेक प्रकल्प रखडून राहिले. आता त्याची कामे जोरदार सुरू आहेत, असेही ते म्हणाले. काँग्रेसमध्ये धडाडीने 35 वर्ष काम करणाऱ्या वाघमारे यांच्यासारख्या नेत्याची त्या पक्षात घुसमट झाली. आता त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले