
पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. त्यामुळे आता राजकारणातील परंपरा सांगत पोटनिवडणुकीत विरोध न करता त्या बिनविरोध करण्यात याव्या असं मत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. कसबा पोटनिवडणुकीत उमेदवार न देता ती निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
तर कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जयंत पाटील यांना फोन देखील केला. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी उमेदवार न देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. तरी देखील कोणताही पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मताला सहमत नसून सर्वानी निवडणुकीला उभं राहण्याचा चंग बांधला आहे.