Home Maharashtra Special कमी पटसंख्येच्या शाळा आता कंत्राटी शिक्षक अन सेवानिवृत्तांच्या हाती

कमी पटसंख्येच्या शाळा आता कंत्राटी शिक्षक अन सेवानिवृत्तांच्या हाती

0
कमी पटसंख्येच्या शाळा आता कंत्राटी शिक्षक अन सेवानिवृत्तांच्या हाती<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

मुंबईः कमी पटाच्या शाळांवर आता कंत्राटी आणि सेवानिवृत्त शिक्षक चांगल्या मानधनावर नेमले जाणार आहेत.त्या संबंधातील माहिती शिक्षण संचालक कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

राज्यात जिल्हा परिषदेच्या ६० हजार ९१२ शाळा असून त्या अंतर्गत जवळपास ४४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात वस्ती शाळा, कमी पटसंख्येच्या शाळांचा देखील समावेश आहे. मागील सहा सात वर्षापासून पटसंख्या कमी असूनही काही शाळा तशाच सूरु असून त्या ठिकाणी विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांची मंजूर व कार्यरत पदे जास्त आहेत. अनेक शाळांमध्ये विद्यार्थी अधिक असतानांही तेथे शिक्षक कमी पडू लागल्याची वस्तुस्थिती आहे. आता दळणवळणाची साधने वाढली असून विद्यार्थ्यांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडे वाढलेला आहे. अशा परिस्थितीत कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थी वाढत नसल्याची वस्तुस्थिती आहे. काही शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गातील पटसंख्या १४ असून त्या ठिकाणी तीन शिक्षक आहेत. ही परिस्थिती आता बदलण्यात येणार असून ज्या शाळांची पटसंख्या अनेक वर्षांपासून वाढलेलीच नाही किंवा कमी झालेली आहे अशा शाळांमधील विद्यार्थी जवळील शाळेत पाठविली जातील. असेही सूत्रांनी सांगितले

जिल्हा परिषद शाळांची सद्यस्थितीः
एकूण शाळा ६० हजार ९१२ विद्यार्थी संख्या ४३.५६ लाख
कमी पट संख्येच्या शाळा ४७९०
संभाव्य कंत्राटी शिक्षक भरती ५००० या शाळांवर टांगती तलवार
सलग तीन वर्षे पटसंख्या वाढीसाठी प्रयत्नहोऊनही विद्यार्थी वाढले नाहीत. पटसंख्या वाढीसाठी सतत प्रयत्न झाले पण विद्यार्थी संख्या घटली.
ज्या शाळांमध्ये १२ अन १४ विद्यार्थी असूनही तेथे तीन शिक्षक असलेल्या शाळा
जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात ( एक किलोमीटरच्या ) आत काही अनुदानित शाळा आहेत.

‘टीईटी’ उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य
कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा बंद करून चालणार नाही, अशा शाळा सुरूच ठेवल्या जाणार आहेत पण शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमीच होत गेली, पण तेथे शासनाचे वेतन घेणारे दोन चार शिक्षक कार्यरत आहेत, अशा शाळांवरील शिक्षक आता जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या शाळेत पाठवले जातील. त्या शाळांवर ‘टीईटी’ उत्तीर्ण उमेदवारांना मानधनावर शिकवण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच काही सेवानिवृत्त शिक्षकांनाही चांगले मानधन देऊन तेथे नियुक्त केले जाईल, असे नियोजन असल्याची माहिती दैनिक फ्रेश न्यूज ला वरिष्ठ सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here