परिषदेत तज्ज्ञांचा विविध विषयांवर ऊहापोह
पिंपरी, पुणे (दि.१८नोव्हेंबर २०२२) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये ‘आंतरराष्ट्रीय डिझाईन एज्युकेशन’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आधुनिक काळानुरूप शैक्षणिक विकास आणि विचार, सर्जनशीलता या विषयांवर उपस्थित तज्ज्ञांनी विचारमंथन केले.
या परिषदेचे आयोजन ब्रेनवर्ल्ड आणि माईंड लान्सर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. परिषदेत भारतातील शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापक, समन्वयक सहभागी झाले होते. या परिषदेच्या प्रमुख पाहुण्या ॲकॅडमी हाइट्स पब्लिक स्कूल मुख्याध्यापिका डॉ. ज्योतिका मलकानी, प्रशिक्षक डॉ. पौर्णिमा त्रिवेदी, स्पेस अँड इंनोवेशन रिसर्च पार्क सीईओ डॉ. अरविंद शाळीग्राम, ईगनाईट इंडिया संचालक कृष्णा आनंद, दळवी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स विश्वस्त अजय दळवी, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे डॉ. संजय मोदी, व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल स्कूल डीन रवी गुप्ता, एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, उपमुख्याध्यापिका पद्मावती बंडा, प्राथमिक विभाग समन्वयिका शुभांगी कुलकर्णी, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान शिक्षिका रिचा अरोरा, अनुसया स्वामी आणि मानव संसाधन कार्यकारी मोनू डेकाटे, मीडिया आणि प्रकाशन विभाग कार्यकारी रोहित सरकार आदी उपस्थित होते.
रेशू अगरवाल (ब्रेनवर्ल्ड संचालक) ‘डिझाईन थिंकिंग’ चे पुढील काळातील महत्व, शिक्षणातील मौल्यवान घटक या विषयावर तर दुपारच्या सत्रामध्ये निधी भंडारे यांच्यासह उपस्थितांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘डिझाईन सर्जनशीलता’ याचे महत्त्व व त्यांचा समावेश अद्यावत शिक्षण पद्धतीमध्ये कशाप्रकारे करता येईल यावर मार्गदर्शन केले. डॉ. बिंदू सैनी यांनी आभार मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, मनीष ढेकळे, अमन यादव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.