Home Pimpri-Chinchwad एकांकिका, व्यावसायिक नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एकांकिका, व्यावसायिक नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एकांकिका, व्यावसायिक नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

पिंपरी: प्रतिनिधी

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची आज पिंपरी – चिंचवड शहरात जोरदार सुरुवात झाली. नाट्यसंमेलनानिमित्त शहरात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये एकांकिका, व्यावसायिक नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. नाट्य संमेलनाच्या या सर्व कार्यक्रमांना मुख्य मंडपासह शहरातील अन्य नाट्यगृहातील कार्यक्रमांनाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात अभिनेते डॉ. संजीवकुमार पाटील आणि नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य किरण येवलेकर यांच्या हस्ते रंगमंच पूजन करण्यात आले. या नंतर  प्रायोगिक नाटक – पुनरुत्थान याचे सादरीकरण करण्यात आले, यास  रसिकांनी मोठी गर्दी केली होती. त्या नंतर अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या व्यावसायिक नाटकाला हाऊस फुल्लचा बोर्ड लागला.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके आणि  सुहास जोशी यांच्या हस्ते रंगमंच पूजन करण्यात आले. यानंतर गणेश वंदना सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत यचकल आणि स्मिता कुलकर्णी यांनी केले. यानंतर अभिनेता भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचे मालवणी भाषेतील व्यावसायिक विनोदी नाटक ‘करून गेलो गाव’चा प्रयोग रंगला. यालाही रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक, सुनील गोडबोले, विजय पटवर्धन, अमोल बावडेकर यांच्या हस्ते रंगमंच पूजन झाले. या नंतर फिरोज मुजावर यांनी गणेश वंदना सादर केली. ऋतूजा  फुलकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. यानंतर पु. ल. देशपांडे लिखित आणि भाऊसाहेब भोईर निर्मित ‘तुज आहे तुजपाशी’ या व्यावसायिक नाटकाचा  प्रयोग रंगला, त्याला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

ग. दि. माडगूळकर- मुख्य रंगमंच येथे आमदार उमा खापरे यांच्या हस्ते रंगमंच पूजन करण्यात आले. यावेळी नाट्य परिषद नियमाक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यानंतर ‘जोडी तुझी माझी’ या नाटकाचा प्रयोग झाला. यानंतर झालेल्या मराठी – हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या रंगमंच २ येथे दिवसभर विविध एकांकिका सादर करण्यात आल्या, त्या पाहण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली.

नाटय संमेलनात सादर होणारी विविध कार्यक्रमांना शहरवासीयांच्या कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासाठी नाटयसंमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी सर्व नाट्यगहाला भेटी दिल्या यावेळी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here