Home Pimpri-Chinchwad एकनाथ शिंदे नॉटरिचेबल; गुजरातमध्ये दाखल?

एकनाथ शिंदे नॉटरिचेबल; गुजरातमध्ये दाखल?

0
एकनाथ शिंदे नॉटरिचेबल; गुजरातमध्ये दाखल?<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

शिवसेनेत फूट पडत असल्याची चर्चा जोरात सुरू असताना आता दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॉट रिचेबल असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदारही असल्याची माहिती आहे.

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे.  शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज दुपारी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार का? याकडे लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here