Home Maharashtra Special ऊसतोड कामगारांसाठीच्या महामंडळाच्या आगामी योजनांना विधी व न्याय विभागाची मान्यता :- उपसभापती डॉ.नीलम गो-हे

ऊसतोड कामगारांसाठीच्या महामंडळाच्या आगामी योजनांना विधी व न्याय विभागाची मान्यता :- उपसभापती डॉ.नीलम गो-हे

ऊसतोड कामगारांसाठीच्या महामंडळाच्या आगामी योजनांना विधी व न्याय विभागाची मान्यता :- उपसभापती डॉ.नीलम गो-हे<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

ऊस तोड कामगारांची नोंदणी प्राधान्याने पूर्ण करा

मुंबई, दि.२५:ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य, सामाजिक न्याय विभाग,महिला व बालविकास विभाग,कामगार विभाग तसेच सामाजिक संस्था काम करत आहेत.स्थानिक पातळीवर या विभागांमार्फत राबविण्यात येणा-या योजनांची जनजागृती करून राज्यातील ऊस तोड कामगारांची सामाजिक न्याय विभागाने नोंदणी प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गो-हे यांनी दिले.

दूरदृश्यप्रणालीव्दारे ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी यापूर्वी घेतलेल्या बैठकीतील निर्देशांबाबत केलेल्या अंमलबजावणी बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे बोलत होत्या.यावेळी या बैठकीला सामाजिक न्याय विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी,सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे,साखर आयुक्त शेखर गायकवाड,सहकार आयुक्त अनिल कवडे,सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव विजय लहाने,कामगार विकास उपआयुक्त सुनिता म्हैसेकर, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे,महिला बालविकास विभागाचे उपसचिव ठाकूर,सामाजिक संस्थाच्या मकाम बीडच्या मनिषा टोकले व पल्लवी हर्षे,समता प्रतिष्ठानच्या शुभांगी कुलकर्णी,महिला आरोग्य परिषद च्या काजल जैन, ऐकल महिला संघटनाचे राम शेळके, साथी चे अभिजित मोरे व अरुण गद्रे, मासुमच्या निलंगी सरदेशपांडे ,आरोग्य अभियानाचे अभय शुक्ला,बहु उद्देशीय सामाजिक संस्था चे श्रीधर आडे,
नाशिक चे सिव्हिल सर्जन डॉ अशोक थोरात यावेळी उपस्थित होते.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यावेळी म्हणाल्या, ऊसतोड कामगारांसाठी विविध विभागांच्या माध्यमातून योजना राबविल्या जातात.ऊसतोडकामगार महामंडळाच्या योजनांना विधी व न्यायविभागाने नुकतीच मान्यता दिली आहे.या योजनांची माहिती ऊसकामगारांना होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने जनजागृतीपर उपक्रम राबवावेत.आरोग्य तपासणी शिबीर,महिलांची तपासणी तसेच गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया (हिस्ट्रेक्टाॅमी ) करण्यासंदर्भात बीड आरोग्य विभागाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा. सार्वजनिक आरोग्य विभागानेही याबाबतची माहिती पडताळून पहावी. परजिल्ह्यात जावून कोणी ऊस तोड महिला शस्त्रक्रिया करत असतील तर त्याचीही माहिती नजीकच्या जिल्ह्यांकडून घेण्यात यावी.ऊस तोड कामगारांचे प्रश्न सुटावेत यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या होत्या.सर्व विभागांनी केलेल्या सूचनांप्रमाणे त्यामध्ये नव्या बाबींचाही समावेश करण्यात येईल.सामाजिक संस्थांनीही ऊस तोड कामगारांसाठीचे कामामध्ये अशाच प्रकारे सातत्य ठेवावे. अशा सूचना या बैठकीत उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी दिल्या.तसेच ऊसतोड कामगारांसोबत महिला व बालविकास विभागाने बीड येथे बैठक आयोजित करावी. १५ फेब्रुवारी रोजी साखर आयुक्त व सहकार आयुक्त यांनी ऊस कारखान्यांच्या संचालकांना सहभागी करून ऊस तोड कामगांराबाबत कोणते निर्णय घेता येतील याबाबत सविस्तर माहिती सादर करावी. सामाजिक न्याय विभागाने ऊस तोड कामगारांची नोंद प्राधान्याने करावी जेणेकरून राज्यातील ऊस तोड कामगारांची माहिती उपलब्ध होईल. अशा सूचना या बैठकीत उपसभापती डॉ.निलम गो-हे यांनी दिल्या.

समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे म्हणाले, राज्यातील उसतोड कामगारांसाठी विविध कल्याणकारी व आर्थिक सुधारणांचा लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.या महामंडळासाठी साडे तीन कोटी रूपये मंजूर झाले आहेत. या महामंडळाचे पुणे येरवडा येथे मुख्य कार्यालय होणार असून परळी येथे क्षेत्रीय कार्यालय सुरू होणार आहे.ऊस तोड कामगांच्या मुला मुलींसाठी राज्यातील ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या तालुक्यांच्या ठिकाणी स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी “संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना” राबविण्यात येते.सध्या मुलांची दहा व मुलींची दहा अशी २० वसतीगृह सुरू करण्यात आली आहेत. ऊसतोड कामगारांची नोंदणीची कार्यवाही लवकरच पूर्ण करणार आहे. ऊस तोड कामगारांचे सर्वेक्षण कार्यवाही सुरू आहे अशी माहिती डॉ.नारनवरे यांनी बैठकीत दिली.

साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाबाबत सहकार आयुक्त व आम्ही संयुक्तपणे काम करत आहोत.सामाजिक न्याय विभागाकडूनही चर्चा करत आहोत. तसेच साखर कारखान्यांसोबत बैठक घेवून ऊस तोड कामगारांसाठी कोणकोणत्या सुविधा देता येत आहेत याची पूर्वप्राथमिक माहिती या बैठकीत दिली.तसेच ऊपसभापती आगामी १५ फेब्रुवारी रोजी याबाबत सविस्तरपणे बैठकीत सादरीकरण करु असे सांगितले.

महिला व बालविकास विभागउपायुक्त राहुल मोरे,जिल्हा आरोग्य विभाग बीड, कामगार विभाग यांनीही त्यांच्या विभागाकडून ऊसतोड कामगारांसाठी सुरू असलेल्या कामांची माहिती यावेळी दिली.

यावेळी ऊसतोड कामगारांसाठी कार्यरत असलेल्या विविध सामाजिक संस्थांनी ऊस तोड कामगारांचे प्रश्न व शासनाने करावयाची कार्यवाही यासंदर्भात सविस्तर मुद्दे मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here