Home Politics ईडी आणि सीबीआय बाजूला ठेऊन लढून दाखवा: सुप्रिया सुळे यांचे आव्हान

ईडी आणि सीबीआय बाजूला ठेऊन लढून दाखवा: सुप्रिया सुळे यांचे आव्हान

ईडी आणि सीबीआय बाजूला ठेऊन लढून दाखवा: सुप्रिया सुळे यांचे आव्हान

पुणे: प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षात खरी हिंमत असेल तर त्यांनी सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना दूर ठेऊन त्यांनी आपल्याशी लढावे, असे आव्हान बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुळशी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या बोलत होत्या यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुत्रप्रेमावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर केलेल्या टीकेचा ही समाचार घेतला.

काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांनी केला आहे. मात्र भाजपा मध्ये प्रवेश केल्यानंतर त्वरित त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले. याउलट भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे दिल्लीचे पंतप्रधान अरविंद केजरीवाल तुरुंगाची हवा खात आहेत, अशी टीका सुळे यांनी केली.

भ्रष्टाचारावर प्रेम करण्यापेक्षा…

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र प्रेम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे कन्या प्रेम यामुळे हे दोन्ही पक्ष फुटल्याची टीका गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. या टीकेचा समाचार घेताना सुप्रिया सुळे यांनी, भ्रष्टाचारावर प्रेम करण्यापेक्षा आपल्या मुलांवर प्रेम करणे केव्हाही चांगले, असा टोला शहा यांना लगावला.