तेल अविव: वृत्तसंस्था
आम्हाला आमच्या देशाचे आणि नागरिकांचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. गाझा पट्टीतून माघार घेण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश हा आमच्यासाठी अपमानकारक आणि अन्यायकारक आहे, अशी टीका करत इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश झिडकाराला आहे.
इस्राएल गाझापट्टीवर अतिक्रमण करून पॅलेस्टाईनच्या नागरिकांचा नरसमोर करीत आहेत, असा आरोप करत दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे दाद मागितली आहे. त्यावर निकाल देताना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला गाझापट्टीवरील आक्रमण थांबवावे आणि त्यासंबंधीचा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. इस्रायलने मात्र या आदेशांचे पालन करण्यास साफ नकार दिला आहे.
पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने ७ ऑक्टोबर रोजी इस्राएलवर जबरदस्त मिसाईल हल्ला चढविला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्राईलने गाझापट्टीवर आक्रमण केले आहे, हमास संघटनेला नेस्तनाबूत केल्याशिवाय आपली लष्करी कारवाई थांबणार नाही, असा निर्धार इस्रायलने व्यक्त केला आहे. इस्राएल आणि हमास यांच्यातील संघर्ष १०० दिवसांहून अधिक काळ सुरू असून त्यात हजारोंचे बळी गेले आहेत.