पुणे: प्रतिनिधी
तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचे सनातन धर्माबाबतचे वक्तव्य मान्य नसेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडावे, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
डेंगू, मलेरिया,कोरोना या रोगांप्रमाणेच सनातन धर्माचे उच्चाटन झाले पाहिजे,. हिंदू धर्म जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असे वक्तव्य स्टॅलिन यांनी केले होते. त्यामुळे देशभरात खळबळ माजली. हे विधान अयोग्य असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते.
या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी या नेत्यांना आव्हानच दिले आहे. स्टायलिंग यांचे मत मान्य नसेल तर ते ज्या आघाडीचा भाग आहे त्या इंडिया आघाडीतून शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडावे, असे मत बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.