Home Entertainment ‘इंडियन आयडॉल’ हा शो प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद: रणबीर कपूर याचे गौरवोद्गार

‘इंडियन आयडॉल’ हा शो प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद: रणबीर कपूर याचे गौरवोद्गार

‘इंडियन आयडॉल’ हा शो प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद: रणबीर कपूर याचे गौरवोद्गार<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

मुंबई: प्रतिनिधी

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय संगीत रियालिटी शो ‘इंडियन आयडॉल 14’ मध्ये ‘शानदार परिवार स्पेशल’  एपिसोड साजरा केला जाणार आहे त्यामुळे आणखी एका धमाकेदार वीकएंड साठी सज्ज व्हा. यावेळी शो मध्ये ‘अॅनिमल’ चित्रपटाचे कलाकार रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना उपस्थित असतील आणि ते केवळ स्पर्धकांनी सादर केलेल्या गाण्यांचा आनंद घेणार नाहीत तर प्रेक्षकांना रिझवणारे काही मनोरंजक किस्से देखील सांगतील.

टॉप 14 स्पर्धक आपल्या कामगिरीने कुमार सानू आणि श्रेया घोषाल या परीक्षकांना प्रभावित करण्यासाठी मंचावर गेले, त्याआधी रणबीर कपूरने या प्रतिष्ठित संगीत शो बद्दल आपले विचार प्रकट केले. तो म्हणाला, “‘इंडियन आयडॉल’ हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा एक शो आहे, कारण या शो ने ज्या प्रकारची प्रतिभा निर्माण केली आहे त्यामुळे आपल्या देशाच्या संस्कृतीला खरोखरच वेगळा दर्जा प्राप्त झाला आहे. यासाठी, मी ‘इंडियन आयडॉल’ शो चे अभिनंदन करू इच्छितो.”

त्याने अलीकडेच या शो मध्ये आलेल्या आपल्या सासर्‍यांचा (महेश भट्ट) उल्लेख केला आणि परीक्षक तसेच स्पर्धकांचे मनापासून कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here