Home Maharashtra Special आमदार रोहित पवारांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरीत राष्ट्रवादी महिला व विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

आमदार रोहित पवारांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरीत राष्ट्रवादी महिला व विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

0
आमदार रोहित पवारांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरीत राष्ट्रवादी महिला व विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />
पिंपरी, दि. १४ – संघर्ष यात्रेच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी केलेल्या अटकेच्या तसेच यात्रेत सहभागी तरुणांवर केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पिंपरी येथे गुरूवारी आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन झाले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कष्टकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल आहेर, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विशाल जाधव, विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस तुषार गाडे, सचिव ऋषभ भडाळे, उपाध्यक्ष ऋषिकेश सत्रे, मुख्य सरचिटणीस चैतन्य बनकर, पिंपरी अध्यक्ष ऋतिक गायकवाड, महाविद्यालय अध्यक्ष अभिषेक कांबळे, सुरज देशमाने, भोसरी विधानसभा अध्यक्ष संकेत वाघमारे, विश्वजित लोंढे, मनोज माने यांच्यासह महिला कार्यकर्त्या सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कष्टकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथजी नखाते म्हणाले, “राज्यात कष्टकऱ्यांवर अन्याय होत आहे. पण तरुणांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या आमच्या नेत्यांवर लाठीचार्ज व अटक करण्याचा प्रयत्न म्हणजे सरकारची दडपशाही आहे. असा प्रकार पुन्हा घडल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.”
राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे आणि महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर यांनीही संघर्ष यात्रेदरम्यान रोहित पवार यांना झालेल्या अटकेचा निषेध केला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल आहेर यांनी या घटनेच्या निषेधार्थ राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच सरकारने विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी अशा प्रकारची दडपशाही केल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये जेरभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारला आगामी निवडणुकांमध्ये हेच तरुण जागा दाखवतील, असे त्यांनी सांगितले. ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विशाल जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here