Home Politics आता मुंबई महानगरपालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन दाखवा: उद्धव ठाकरे यांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

आता मुंबई महानगरपालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन दाखवा: उद्धव ठाकरे यांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

आता मुंबई महानगरपालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन दाखवा: उद्धव ठाकरे यांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

मुंबई: प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीपैकी ३ राज्यात भारतीय जनता पक्षाला भरघोस यश मिळाले आहे. आता मुंबई महापालिकेची निवडणूकही घेऊन दाखवा, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. कोणाच्या मनात शंका राहू नयेत म्हणून लोकसभेची एक निवडणूक मतदान यंत्रावर घेण्याऐवजी मतपत्रिकेवर घ्या, असेही त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले आहे.

ठाकरे गटाच्या नूतनीकरण केलेल्या शिवालय या कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला भरघोस यश मिळाले आहे. आता दोन वर्ष प्रलंबित ठेवलेली मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी भाजप यांची एवढी लाट असल्याची खात्री असेल तर लोकसभेची निवडणूक मतदान यंत्र ऐवजी मतपत्रिकेवर घ्यावी, अशी मागणी करतानाच भाजपला या निवडणुकीत मिळालेले यश यंत्रामुळे असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. सगळीकडे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वातावरण असताना, निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचे निकाल विरोधात असताना  सत्ताधाऱ्यांच्या बाजूने निकाल कसा लागतो, असा सवाल करतानाच ठाकरे म्हणाले की, हिम्मत असेल तर मतदारांमधील शंका दूर करण्यासाठी मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन दाखवा.

देशाचे आणि देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरविणाऱ्या निवडणुकांचे मतपत्रिका मोजणी मुळे विलंबाने निकाल लागले तरी चालण्यासारखे आहे. तुमच्यात खरोखर हिम्मत आणि आत्मविश्वास असेल तर मतपत्रिकेवर लोकसभेची निवडणूक घ्या. किमान मुंबई महापालिकेची निवडणूक तरी मतपत्रिकेवर घ्या, असे आव्हान ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here