Home Pimpri-Chinchwad आचार्य अत्रे खाजगी संस्थेला चालवायला दिल्यास जनआंदोलन करू : सुजाता पालांडे

आचार्य अत्रे खाजगी संस्थेला चालवायला दिल्यास जनआंदोलन करू : सुजाता पालांडे

0
आचार्य अत्रे खाजगी संस्थेला चालवायला दिल्यास जनआंदोलन करू : सुजाता पालांडे<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />
– निविदा प्रक्रिया न राबवता थिएटर वर्कशॉप कंपनीचे लाड नको
– पालांडे यांचे आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन
पिंपरी / प्रतिनिधी – संत तुकाराम नगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी चालवायला देण्याचा घाट पिंपरी चिंचवड महापालिकेने घातला आहे. थिएटर वर्कशॉप या खाजगी संस्थेचे लाड पुरविण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता त्याला मान्यता दिली जात आहे. या पाठीमागे केवळ संस्थेचे हीत जोपासण्याचा उद्देश महापालिका अधिकाऱ्यांचा दिसत आहे. संबंधित संस्थेला असे रंगमंच चालविण्याचा कोणताही अनुभव नाही. तसेच इतर सभागृह किंवा रंगमंदिर चालविण्यास न देता केवळ आचार्य अत्रेच खाजगी संस्थेला चालवण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया ताबडतोब थांबवावी, अन्यथा या निर्णयाविरोधात जनआंदोलन छेडू, असा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश प्रसिद्धीप्रमुख सुजाता पालांडे  यांनी दिला.  या बाबत आयुक्त शेखर सिंह यांना देखील पालांडे यांनी निवेदन दिले आहे.
पालांडे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, शाळेतील स्नेहसंमेलन, सभा, विविध कार्यक्रम घेता यावेत, यासाठी संत तुकाराम नगर पिंपरी येथे आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आले. नुकतेच त्याची डागडुजी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. महापालिकेने अधिकचा खर्च केला असता तर आणखीन सुसज्ज झाले असते. मात्र महापालिकेने अधिकचा खर्च करण्यास नकार दिला. सध्या कार्यक्रमांसाठी हे रंगमंदिर सुरु करण्यात आले आहे. येथील दर सर्वसामान्य नागरिकांना कार्यक्रमासाठी परवडणारे आहेत. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान कार्यक्रमांची संख्या देखील अधिक असते. मात्र महापालिकेने खाजगी संस्थेला आचार्य अत्रे चालवायला देण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
सदरचा प्रस्ताव महापालिका सभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे. कमी भाडे असल्यामुळे हे रंगमंदिर  सदरची संस्था घेत आहे. या संस्थेला अशी मोठी सभागृहे चालविण्याचा कोणताही अनुभव असल्याचे दिसत नाही. खाजगी संस्थेच्या सोयीसाठी या रंगमंदिरात सुविधा देण्यासाठी सुमारे ४० लाखांचा खर्च करायला महापालिका तयार आहे. मात्र पूर्वी डागडुजी करायला पैसे नसल्याचे सांगून दुटप्पी भूमिका घेत आहे. या संस्थेला रॅम्प, पार्किंग, कँटीन आणि पार्किंगसाठी दोन लेन देखील देण्याचे ठरले आहे. या बरोबरच खालील हॉल, ग्रंथालय देखील दिले जाणार आहे. या सुविधा देण्याबाबत तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिलेली नसल्याचे समजते. तरीही ते दिले जाणार आहे. या खाजगी संस्थाद्वारे नंतर इतरांना भाड्याने रंगमंदिर देऊन अधिकचे पैसे उकळण्याचा डाव दिसत आहे. त्याचा महापालिकेला कोणताही फायदा होणार नाही. तसेच थेट पद्धतीने त्या संस्थेला न देता त्याची निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. केवळ तसेच केवळ आचार्य अत्रे खाजगी संस्थेला न देता शहरातील सर्वच सभागृहे निविदा प्रक्रिया राबवून खाजगी संस्थेला द्यावीत, अशी मागणी पालांडे यांनी केली. या बाबत सकारात्मक विचार करून, ही प्रक्रिया थांबवावी. अन्यथा नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश प्रसिद्धीप्रमुख सुजाता पालांडे  यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here