Home Pimpri-Chinchwad आगामी निवडणुकांसाठी भाजपची मेगा प्लॅनिंग

आगामी निवडणुकांसाठी भाजपची मेगा प्लॅनिंग

0
आगामी निवडणुकांसाठी भाजपची मेगा प्लॅनिंग<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

नाशिक येथे दोन दिवशीय भाजप कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली असून आगामी निवडणुकांसाठी मेगा प्लॅनिंग ठरवले आहे. या बैठकीत ‘महाविजय २०२४’ (Mission 2024) म्हणून संकल्प’ करण्यात आला आहे. नाशिकमध्ये दोन दिवशीय भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेश पदाधिकारी आगामी निवडणुकांच्या रणनीती संदर्भात विचारमंथन करण्यात आले.

नाशिकमध्ये दोन दिवशीय भाजप कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली असून भाजपकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महत्वाची घोषणा करण्यात अली आहे. राज्यातील आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाने लोकसभेसाठी मिशन ४५ तर विधान सभेसाठी मिशन २००चे लक्ष्य निश्चित केले असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. यासोबतच शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यत पोहोचवणार असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर आमदार श्रीकांत भारतीय यांची प्रदेश संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली असून निवडणूक इन्चार्ज म्हणून ते काम पाहणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

भाजपचा महाविजय २०२४ महासंकल्प

पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार असून भाजपने पुन्हा मिशन २४ची घोषणा केली आहे. राज्यातून ४८ खासदार निवडून जातात सध्या भाजपकडे २३ खासदार आहेत भाजपला केंद्रात पुन्हा यायचे असेल तर महाराष्ट्रातून किमान ४० जागांचे बळ भाजपला हवे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून खासदारांची कुमक भाजपला हवी आहे त्यामुळे या बैठकीत लोकसभेसाठी मिशन ४५ची घोषणा करण्यात आली आहे. तसेच राज्यसभा निवडणुका देखील आगामी काळात होणार असल्याने या निवडणुकांसाठी भाजपकडून मिशन २००चा नारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here