Home Maharashtra Special अमृता फडणवीस यांच्या हस्ते प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयास इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान

अमृता फडणवीस यांच्या हस्ते प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयास इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान

0
अमृता फडणवीस यांच्या हस्ते प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयास इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

प्रभू श्रीरामाचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे – बी. के. डॉ. सुवर्णा

पिंपरी, पुणे (दि. २१ जानेवारी २०२४) चंद्राच्या प्रतिमेप्रमाणे शांत आणि शीतल व्यक्तिमत्त्वाच्या श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी अयोध्या येथे होत आहे. त्यामुळे जगभर सर्वत्र उत्साही, आनंदी वातावरण आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे संयम, नियम पाळणारे होते. आई-वडिलांचे आज्ञाधारक आणि प्रामाणिकपणा ही त्यांची विशेषता आहे. अहिल्याचा उद्धार करून तिला मुक्त केले, शबरीची बोरं खाऊन तिचा आदर केला अशा प्रभू श्रीरामाचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असे प्रजाप्रीता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय बाणेर येथील सेंटरच्या बी. के. डॉ. सुवर्णा यांनी सांगितले.
सोमवारी अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिरात श्री राम लल्ला ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्त देशभर विविध ठिकाणी धार्मिक, सामाजिक कार्यक्रम भक्तिमय, आनंदमय, वातावरणात साजरे होत आहेत.

या मुख्य कार्यक्रमाचे निमंत्रण प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांना प्राप्त झाले आहे. त्यानिमित्त बाणेर, पुणे येथील सेवा केंद्राच्या वतीने रविवारी (दि.२१) श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची ५० फूट उंच व ४० फूट रुंद या आकाराची सर्वात मोठी विश्व विक्रमी निमंत्रण पत्रिका साकारण्यात आली आहे. जगभरात १२३ देशात ध्यानधारणा शिकविणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या या भव्य पत्रिकेची नोंद इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

त्याचे प्रमाणपत्र अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजक बी. के. डॉ. त्रिवेणी दीदी, बी. के. डी. सुवर्णा दीदी व १८२ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय व या विश्व विक्रमाचे संयोजक बी. के. डॉ. दीपक हरके यांना प्रदान करण्यात आले.

या विश्वविक्रमी निमंत्रण पत्रिकेच्या उद्घाटन प्रसंगी पंचक्रोशीतील रामभक्त पारंपारिक वेशभूषित सहभागी झाले होते. महिला भगिनींनी मंगल कलश घेऊन रामनामाचा जप केला. यावेळी भाजपाच्या पदाधिकारी निकिता माताडे उपस्थित होत्या.

बी. के. डॉ. त्रिवेणी यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना जरी अयोध्येत होणार असली तरी, त्याची सकारात्मक ऊर्जा अवघ्या जगभर पसरली आहे. परमात्मा ने जो आपल्याला सत्य मार्ग सांगितला आहे, त्या भावनात्मक आणि श्रेष्ठ मार्गाचे आचरण करून आपण सर्व रामामय होऊ शकतो. यातून निर्माण होणाऱ्या राम भक्ति भावाने आपण स्वास्थ्य आणि शांती प्राप्त करू शकतो. आज जरी आपण अयोध्येत प्रत्यक्ष जात नसलो तरी या कार्यक्रमातून सर्वजण मन आणि आत्म्याच्या रूपाने अयोध्येत आहोत.

स्वागत, प्रास्ताविक करताना आयोजक बी. के. डॉ. दीपक हरके यांनी सांगितले की, आपण सर्वजण प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या द्वारे शिकविल्या जाणाऱ्या
ध्यान धारणेच्या नियमित अभ्यासाने श्रीरामा सारखे दिव्य गुण धारण करुन स्व परिवर्तनाने विश्व परिवर्तन करुन खरे राम राज्य जगात आणू शकतो, असे डॉ. हरके यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here