पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे ‘अपने अपने राम’ या तीनदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन आरटीओ जवळील एसएसपीएमएसच्या मैदानात करण्यात आले आहे. त्याच्या पहिल्या दिवशी (शुक्रवा, दि.१५ डिसेंबर) डॉ. कुमार विश्वास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अयोध्येमध्ये जानेवारी २०२४ मध्ये पूर्णत्वास येत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर स्थापनेच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीतमय राम ऊर्जा सत्राकरिता पुणे, पिंपरी-चिंचवड सह जिल्ह्यातून ५ हजार हून अधिक समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या कार्यक्रमाला सहाय्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींचा सन्मान देखील करण्यात आला.
श्रीराम कथा आणि वर्तमानात प्रभू श्रीरामांच्या जीवनातील मूल्यांचे महत्व अत्यंत सोप्या शब्दात मांडत तरुणाईला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामनामाचा जयघोष करण्यात आला. तर, देवा श्री गणेशा, श्रीराम जानकी बैठे हे मेरे सीनेमे, सजादो घर को दुल्हन सा.. मेरे घर राम आये है यांसह विविध गीतांच्या सादरीकरणाने सूरमयी प्रारंभ झाला. कविता तिवारी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.