पुणे: प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड रिसर्च महाविद्यालयात माहे सप्टेंबर २०२३ पासून इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन यामधील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी इन्टर इन्स्टीट्यूशनल इन्क्लुजीव इनोवेशन सेंटर (आय ४ सी) आणि नेत्रा एक्सिलेटर फाऊंडेशनतर्फे उच्च तंत्रशिक्षण देण्यासाठी विद्यालिप हा कौशल्य व विकासाअंतर्गत अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा. प्रमिला गायकवाड आणि इन्टर इन्स्टीट्यूशनल इन्क्लुजीव इनोवेशन सेंटर (आय ४ सी) या कंपनीचे मुख्याधिकारी विवेक पवार यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.
हा अभ्यासक्रम ४ महिन्यांचा असून या अभ्यासक्रमांतर्गत अम्बेडेड सिस्टम डिझाईन सॉफ्टवेअर व हार्डवेअर या मधील अत्याधुनिक माहिती व तंत्रज्ञानाविषयी प्रात्यक्षिकासह संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे. तसेच या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून इलेक्टॉनिक्स उद्योगधंदयातील क्षेत्रात यंत्रसामुग्रीचे प्रोजेक्ट तयार करून घेण्यात येणार आहेत. सदर प्रोजक्टमुळे विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये केले जाणाऱ्या यंत्रसामुग्री प्रोजेक्टची माहिती व अनुभव मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला विद्यालिप या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
तांत्रिक प्रशिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष दिले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना विविध इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सोय, भोजन व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची मुदत दि. ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत राहणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी विक्रम पाटील मो. ८०५०७३८०६०, ई-मेल vikram.patil@i4c.in यांच्याशी संपर्क करावा.
या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना कंपनीत नोकरी लागल्यानंतर त्यांच्याकडून काही नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.
सदर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी प्रमिला गायकवाड, श्रीधर शुक्ला, अजय भागवत, डॉ. राजेंद्र जगदाळे व डॉ. सुनिल ठाकरे यांनी सहकार्य केलेले आहे.