Home Maharashtra Special अच्युत गोडबोले यांना ‘मसाप जीवनगौरव’

अच्युत गोडबोले यांना ‘मसाप जीवनगौरव’

0
अच्युत गोडबोले यांना ‘मसाप जीवनगौरव’<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />
प्रा.डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांना ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ जाहीर
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ज्येष्ठ भाषा अभ्यासक आणि लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांना जाहीर झाला आहे. २५,०००/- रु. आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
मसापचा ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांना जाहीर झाला असून ११,०००/- रु. आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
हे पुरस्कार मसापच्या २७ मे रोजी होणाऱ्या वर्धापनदिन समारंभात परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत यांच्या हस्ते आणि मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा. जोशी म्हणाले, “संगणकापासून नॅनोटेक्नॉलॉजीपर्यंत, व्यवस्थापनापासून संगीतापर्यंत, अर्थशास्त्रापासून मानसशास्त्रापर्यंत विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या अच्युत गोडबोले यांनी मराठीतील ज्ञानलक्ष्यी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना मसाप जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करताना परिषदेला आनंद होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here