पिंपरी :- संपूर्ण भारतातील 10 कोटी अग्रवाल वंशजांची एकमेव राष्ट्रीय प्रातिनिधिक संघटना असलेल्या अखिल भारतीय अग्रवाल संमेलनातर्फे आयोजित अग्रोदय महाअधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 24 डिसेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय अग्रवाल संमेलनातर्फे 24 ते 25 डिसेंबर दरम्यान डेक्कन कॉलेज ग्राउंड, येरवडा येथे अग्रोदय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अग्रोदय महाअधिवेशनात 24 डिसेंबर 2022 रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती अग्रोदय महासंमेलन आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी दिली.
तसेच 24 डिसेंबर रोजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महिलांसाठी विशेष अधिवेशन होणार आहे. यावेळी प्रसिद्ध टीव्ही मालिका बालिका वधू अभिनेत्री स्मिता बन्सल महिला संमेलनात प्रमुख सेलिब्रिटी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. आणि अधिवेशनात महिलांनाही मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनाच्या विविध सत्रांमध्ये नामवंत वक्ते, नामवंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती नीता अग्रवाल आणि महाराष्ट्र अध्यक्ष अनुप गुप्ता यांनी दिली.
महिला अधिवेशनात राष्ट्रीय कार्यसमितीने महिलांची उन्नती आणि सुरक्षितता यावर व्यापक कार्यक्रम जाहीर केले आहेत. राज्यातील 2000 हून अधिक महिलांनी नोंदणी करणे अपेक्षित आहे. या महिला संमेलन सत्रात शिक्षण, वैवाहिक समुपदेशन, सुरक्षा, करिअर या विषयावर विविध कार्यक्रम व चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
अग्रवाल समाजाच्या प्रगतीसाठी अग्रोदय महाअधिवेशनात महिला संमेलन, व्यवसाय संमेलन, युवा संमेलन, महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रातील 25 नामवंत व्यक्तींना अग्र पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.
अग्रवाल समाजाच्या प्रगतीसाठी अग्रोदय महाअधिवेशनात महिला संमेलन, व्यवसाय संमेलन, युवा संमेलन, महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रातील 25 नामवंत व्यक्तींना अग्र पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.
व्यवसाय समितीचे अनिल मित्तल आणि दीपक बन्सल यांच्यासह संपूर्ण आयोजन समितीने या अग्रोदय महाअधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि सहभागी होण्यासाठी http://www.agrasenbhagwan. org/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी (रजिस्टे्रशन) करावी, असे आवाहन केले आहे.