
नागपूर: प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिंषदेच्या वतीने ३० वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन १४ ऑक्टोबर रोजी देशपांडे सभागृह येथे होणार असल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिध्द साहित्यिक शरद गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी साहित्य परिषदेचे विदर्भ कार्याध्यक्ष नामदेव राठोड, नागपूर शहराध्यक्ष सागर मानकर, महराष्ट्र प्रदेश संघटक सुनिल साबळे ,नागपूर विभागीय उपाध्यक्ष प्रा. किरण पेठे आदीजण उपस्थित होते ,
ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, चर्चासत्र असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे. या संमेलनास मोठया संख्येने साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. या अगोदर पुणे, मुंबई, सोलापूर, सांगली, बारामती, संभाजीनगर, लातूर, तुळजापूर, गोंदिया, वणी, उदगीर, धाराशिव आदी ठिकाणी संमेलनं संपन्न झाली आहेत.
नारायण सुर्वे, वसंत बापट, द. मा.मिराजदार, केशव मेश्राम, सुरेश भट, शिवाजी सावंत, विश्वास पाटील, आ.ह.साळुंखे, गंगाधर पानतावणे, प्रा.श्रीपाल सबनीस या सारख्या दिग्गज साहित्यिकांनी संमेलनाध्यक्ष म्हणून संमेलनास हजेरी लावली आहे तर पु.ल.देशपांडे, जावेद अख़्तर, शरद पवार, जगदिश खेबूडकर, ना. धो. महानोर यांच्यासह अनेक मान्यवरांनी संमेलनाचे उद्घाटन केले आहे.