नागपूर: प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३० वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर या ठिकाणी १४ ऑक्टोबर २०२३ रोजी संपन्न होत आहे
या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष इंजि.विजय घोगरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली आहे.
दिवसभर चालणाऱ्या या साहित्य संमेलनास मोठ्या संख्येने साहित्यिक उपस्थित राहणार आहेत ग्रंथदिंडी, परिसंवाद, चर्चासत्र, कथाकथन कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत .